डिझेल टँकर उलटल्याने घेतला पेट , आगीत जळून एकाचा दुदैवी मृत्यू

डिझेल टँकर उलटल्याने घेतला पेट , आगीत जळून एकाचा दुदैवी मृत्यू

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ शहरालगतच्या दारव्हा मार्गावरील भोयर घाटात डिझेल घेऊन जात असताना वळणावर वाहकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला . या अपघातात डिझेल लिक होऊन स्फोट झाला. या भीषण अपघातात एकाचा जागीच जळून कोळसा झाला. तर दोघे गंभीर जखमी आहे. डिझेल टँकर फुटल्याने डिझेल रस्त्यावर वाहू लागल्याने सर्वत्र आग पसरली. त्यामुळे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. शर्थीचे प्रयत्न करून दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

यवतमाळातून दारव्हा येथे डिझेल घेऊन जात असलेला 20 हजार किलो लिटरचा टँकर भोयर घाटात पलटी झाला. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यात टँकरचा कप्पा फुटल्याने डिझेल वाहू लागले. लगेच डिझेलने पेट घेतला. टँकरमध्ये असलेले तिघे जण जिवाच्या आकांताने बाहेर पडले. मात्र डिझेल सर्वत्र पसरल्याने मोठा भडका उडाला. यात एकजण जागीच जळून कोळसा झाला. तर उरलेले दोघे गंभीर अवस्थेत दारव्हाकडे निघून गेले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. टँकर स्फोटाची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. येथील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने रस्त्यावरील वाहतूक बंद केली. आगीवर फोम व पाणी असा आळीपाळीने फवारा करून आग विझविण्याचे प्रयत्न झाले. प्रत्यक्षदर्शीनी दुरुन पाहिलेले दृश्य अंगावर काटा आणणारे होते असे सांगितले. आगीमुळे जवळपास तीन तास वाहतूक विस्कळीत होती ती आता पूर्ववत केली आहे .

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;