Lok Sabha Election 2024 – विखे यांच्या पन्नास वर्षाच्या यंत्रणेला निलेश लंके यांच्याकडून धक्का
नीलेश लंके यांना घेरण्यासाठी डमी निलेश लंके या उमेदवारासह एम आय एम आदी उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची खेळी करणाऱ्या सुजय विखे यांना आमदार निलेश लंके यांनी धोबीपछाड दिली आहे.
गेल्या पन्नास वर्षापासून विखे यांची यंत्रणा वेगवेगळ्या क्लुप्त्या लढऊन समोरच्या उमेदवारास नामोहरम करीत असे. या निवडणुकीतही तसेच झाले. मात्र विखे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नीलेश लंके यांनी विखे यांचा क्लीन बोल्ड करीत त्यांच्या डावपेचाना परतून लावण्यात यश मिळविल्याचे अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले.
निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर विखे यांनी लंके यांना बॅक फूटवर आणण्याचा बरेच वेळा प्रयत्न केला, मात्र वेळोवेळी खा. विखे हेच ट्रोल झाल्याचे पहावयास मिळाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List