निवडणूक पथकाने हस्तगत केली 1 लाख 19 हजारांची रक्कम

निवडणूक पथकाने हस्तगत केली 1 लाख 19 हजारांची रक्कम

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे निवडणूक भरारी पथकाने 1 लाख 19 हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. रविवारी दुपारी पावणेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली.

शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत पथकाने ही कारवाई केली आहे. नियमित तपासणी करत असताना नेवासा – श्रीरामपूर रोडवर नेवासाकडून श्रीरामपूर कडे येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असतांना एका चारचाकी गाडीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 50 हजार रुपयांच्या वरील रकमेचा हिशोब संबंधितास व्यवस्थित न देता आल्यास सदर रक्कम जमा करण्यात येत असते.

शिर्डी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी दंडाधिकारी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई अमोल शरद लांडे, सोमनाथ तुळशीराम बलमे, व्हिडिओग्राफर समीर हमीद शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;