सरकारी नोकरी आहे का? आरती सिंह हिचा पती दिसण्यावरुन ट्रोल, ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

सरकारी नोकरी आहे का? आरती सिंह हिचा पती दिसण्यावरुन ट्रोल, ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

टीव्ही अभिनेत्री आरती सिंह सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच अभिनेत्रीने बॉयफ्रेंड दीपक चौहान याच्यासोबत लग्न केलं. लग्नात अभिनेत्री मामा गोविंदा देखील उपस्थित होते. शिवाय बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील देखील अनेक सेलिब्रिटी आरती – दीपक यांच्या लग्नासाठी आले होते. 25 एप्रिल रोजी दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नानंतर पहिल्यांदा अभिनेत्रीला पतीसोबत स्पॉट करण्यात आलं. तेव्हा आरती नव्या नवरीच्या रुपात प्रचंड सुंदर दिसत होती. सिंदूर आणि चुड्यात अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत होतं. दोघांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने जो व्हिडीओ पोस्ट केला आहे, त्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री लाल रंगाच्या साडीत पतीसोबत पोज देत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री आनंदी दिसत आहे. चाहत्यांनी देखील व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पण काही नेकऱ्यांनी अभिनेत्रीच्या पतीला दिसण्यावरुन ट्रोल केलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘सरकारी नोकरीवाला आहे का?’ तर अनेकांनी आरती आणि तिच्या पतीची तुलना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील बबीता-अय्यर यांच्यासोबत केली आहे. अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘दोघांची जोडी म्हणजे एटली आणि त्याची पत्नी आहे…’ सध्या सर्वत्र आरती आणि दीपक यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

आरती सिंह हिच्या पतीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचा पती उद्योजक आहे. दोघे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आरती – दीपक यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी कुटुंबिया आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं.

आरती हिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;