…म्हणून फडणवीसांनी काँग्रेसला मतदान करावे; कोरोना लसीच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा टोला

…म्हणून फडणवीसांनी काँग्रेसला मतदान करावे; कोरोना लसीच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा टोला

भाजपने 10 वर्षांच्या सत्ताकाळात कोणतीही विकासकामे केली नसल्याने त्यांच्याकडे प्रचारासाठी मुद्देच नाहीत. भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी विकासावर बोलावे, असे आव्हान विरोधकांनी अनेकदा देऊनही भाजपकडून विकासावर बोलण्यात येत नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला मतदान करण्यासाठी कोरोना लसीचा दाखला दिला. भाजपच्या कार्यकाळात कोरोना लस उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे जनतेने भाजपला मदतान करावे, असे ते म्हणाले. या त्यांच्या विधानावर पलटवार करत जयंत पाटील यांनी फडणवीसांना जबरदस्त टोला लगावला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच करोनावरील लस उपलब्ध झाली आणि देशातील जनतेचे प्राण वाचले, त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना मत देत त्यांना विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. फडणवीस यांच्या विधानाप्रमाणे काँग्रेसच्या काळात पोलिओची लस तयार झाली होती. त्यामुळे फडणवीसांनी आता काँग्रेसला मत द्यावे, असा टोला पाटील यांनी लगावला. काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काळात पोलिओची लस तयार झाली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आता काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मत द्यावे, असे जयंत पाटील म्हणाले.

गेल्या 10 वर्षात मोदींना काय केले, हे फडणवीसांनी सांगितले पाहिजे. पण दुर्दैवाने त्यांना कोणतेही काम सांगता येत नाही. महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातमध्ये गेले, तेव्हा ते काहीही बोलले नाहीत. अशी शरण गेलेली लोकं राज्याचा विकास करू शकत नाही. महाराष्ट्र हा लढणाऱ्या लोकांचा आहे. त्यामुळेच शरद पवारांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे, असेही पाटील म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;