…तर देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच सुवर्णपदक मिळेल, रोहित पवार यांचा खोचक टोला

…तर देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच सुवर्णपदक मिळेल, रोहित पवार यांचा खोचक टोला

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एका प्रचारसभेमध्ये
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी राजकारणीच नाही, त्यामुळे मला राजकारणातील छक्के-पंजे कळत नाही. जो माझ्या विश्वासघात करतो ईश्वर त्याचा सत्यानाश करतो’, असे विधान केले होते. त्याचाच आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जाहीरपणे यामागे आपला हात असल्याची कबुली दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सूचक विधानं केली होती. आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मात्र त्यांनी आपल्याला राजकारण कळत नाही असे म्हटले. याचा समाचार घेत ‘खोटे बोलण्याच्या स्पर्धेत देवेंद्र फडणवीस’, यांना सुवर्णपदक मिळेल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

सोमवारी दुपारी रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील एक क्लिप शेअर केली. यासोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल! …आणि आज ज्याला तुम्ही ईश्वराचा आशीर्वाद म्हणताय ना ते आशीर्वाद नाही तर सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत…तुम्ही कुणाला येडं बनवता? ईश्वराचा आशीर्वाद कुणाला आहे, हे 4 जूनला स्पष्ट होईल, असा घणाघात रोहित पवार यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;