हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; सीएसएमटीजवळ लोकलचा डबा घसरला

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; सीएसएमटीजवळ लोकलचा डबा घसरला

पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या एका लोकलचा डबा सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जवळ सकाळी 11.35 वाजण्याच्या सुमारास घसरला. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेत कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

सीएसएमटीजवळ लोकलचा डबा घसरल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वडाळा ते सीएसएमटीपर्यंत एप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच इतर गाड्या वडाळ्यापर्यंत चालवण्यात येत असून वडाळ्यापासून पुन्हा परतीचा प्रवास करत आहेत. या घटनेचा मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;