‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये 7 वर्षांचा लीप; नव्या प्रोमोने वेधलं लक्ष
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत एक नवा अध्याय सुरु होत आहे. मालिका आता सात वर्षांची लीप घेत आहे. अप्पी आणि अर्जुन दोघेही सात वर्षे आपल्या जीवनात वेगवेगळ्या वाटेवर जगत असताना आता नियती परत त्यांना समोर आणणार आहे.
नुकतंच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अप्पी अर्जुनला वचन देते की, ती अमोलला त्याच्या वडिलांबद्दल कधीच काही सांगणार नाही. पण सात वर्षानंतर अप्पी उत्तराखंडमधील अल्मोराला कलेक्टर म्हणून काम करत आहे. तेव्हा अर्जुन एका गुन्हेगाराच्या शोधात उत्तराखंडला येतो.
अमोलचा रिझल्ट असल्याने तो देवाला रिझल्टसाठी नाही तर अप्पीला त्याच्या शाळेतील करामती कळू नये म्हणून प्रार्थना करतोय. जेव्हा मंदिरातील घंटा वाजवण्यासाठी त्याचा हात पोहोचत नाही तेव्हा अर्जुन तिकडे येऊन त्याला आपल्या खांद्यावर उचलून घेतो.
अर्जुन अमोलला मंदिरातील घंटा वाजवण्यासाठी मदत करतो. या प्रोमोने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलंय. या प्रोमोमधील अप्पी आणि अर्जुन यांच्या नवीन लूकबाबतही प्रेक्षकांमध्ये चर्चा होतेय. मालिकेच्या या नव्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळतेय.
या मालिकेत बालकलाकार साईराज केंद्रेनं एण्ट्री घेतली आहे. साईराज हा या मालिकेत अप्पी आणि अर्जुनचा मुलगा अमोलचं पात्र साकारणार आहे. मालिकेत प्रेक्षकांना गोष्ट सात वर्षांनी पुढे गेलेली पाहायला मिळेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List