‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला थेट धमकी; अभिनेत्री म्हणाली ‘येच तू कर्जतला..’

‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला थेट धमकी; अभिनेत्री म्हणाली ‘येच तू कर्जतला..’

‘ठरलं तर मग’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. इन्स्टाग्रामवर एका युजरने जुईला थेट धमकी दिली आहे. आम्हाला फॉलो कर, नाहीतर तुला पोलिसांत टाकू, असं युजरने लिहिलं आहे. त्याचा स्क्रीनशॉट शेअर करत जुईनेही संबंधित युजरला सडेतोड उत्तर दिलं आहे. येच तू कर्जतला, बघतेच मी पण.. असा इशारा जुईने दिला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

इन्स्टाग्रामवर जुई गडकरीला धमकी

‘काय गं, तुला खूप माज आलाय का? आम्ही फॉलो करायचं आणि तुला आम्हाला फॉलो करायला काय झालं? कळत नाही का तुला? आताच्या आता आम्हाला फॉलो करायचं. सपना पांचाळ, राखी सुतार, करुणा विन्हेरकर, यश विन्हेरकर यांना तू फॉलो कर. नाहीतर तुला जेलमध्ये टाकेन. आजपर्यंत तू आमची आवडती होतीस, कारण आम्हाला वाटलं की तू आम्हाला फॉलो करशील. पण नाही. म्हणून मी तुला पोलिसांत टाकेन. मी उद्याच्या उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला समजलं. कुठेही पळायचं नाही’, अशा शब्दांत जुईला धमकी देण्यात आली.

मेसेजचा हा स्क्रीनशॉट शेअर करत जुईनेही ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘हे सहन केलं जाणार नाही, आधीच सांगते. थेट पोलीस स्टेशनला भेटू मग आपण’, असं तिने लिहिलंय. त्याचसोबत ‘राखी सुतार.. झालीस तू फेमस. येच कर्जतला, बघतेच मी पण’, असा इशारा जुईने दिला आहे.

कलाविश्वात काम करणाऱ्या अनेक सेलिब्रिटींना अशा ट्रोलिंगचा सतत सामना करावा लागतो. अनेकदा या ट्रोलिंगमागचं कारणही अत्यंत क्षुल्लक असतं. काही दिवसांपूर्वी अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याच्या पत्नीला ‘जहांगीर’ या त्यांच्या मुलाच्या नावावरून प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर चिन्मयने भविष्यात कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकाणार नसल्याचा मोठा निर्णय जाहीर केला होता. आता जुई गडकरीने ट्रोलरला थेट उत्तर दिलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;