केंद्रात पुढील सरकार आपच्या पाठिंब्याने बनणार; भगवंत मान यांचा दावा
केंद्रात पुढील सरकार आपच्या पाठिंब्यानेच बनणार, असा दावा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकांचे दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. या दोन टप्प्यात 190 जागांवर मतदान झाले आहे. त्यात इंडिया आघाडी 120 ते 125 जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच निवडणुकानंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल आणि आपचा त्याला पाठिंबा असेल, असेही मान यांनी स्पष्ट केला.
आपण मंगळवारी आपचे प्रमुख केजरीवाल यांची भेट घेणार आहोत. केंद्रात पुढील सरकार आपच्या पाठिंब्यानेच बनणार असून त्यात आम्ही महत्त्वाचा घटक असणार आहोत, असेही मान म्हणाले. आपचा इंडिया आघाडीचा घटक आहे. मात्र, पंजाबमध्ये आप स्वतंत्रपणे लढत आहे. पंजाबमध्ये 13 जागांवर भाजपला उमेदवार मिळत नसल्याचेही मान म्हणाले. त्यांचा पराभव निश्चित असल्याने कोणीही उमेदवारीसाठी पुढे येत नसल्याचे मान म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List