पिकअपची उभ्या ट्रकला धडक; भीषण अपघातात 5 महिला आणि 3 लहान मुलांसह 9 जणांचा मृत्यू

पिकअपची उभ्या ट्रकला धडक; भीषण अपघातात 5 महिला आणि 3 लहान मुलांसह 9 जणांचा मृत्यू

छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातील कठिया गावाजवळ रविवारी रात्री भीषण अपघात झाला. खचाखच भरलेल्या पिकअपने रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश असून 20हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गंभीर जखमींना रायपूरच्या एम्स रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. तर इतर जखमींवर बेमेतराच्या जिल्हा रुग्णालयात आणि सिमगाच्या आरोग्य केंद्रामध्ये सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पथर्रा गावचे रहिवासी एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पिअकप वाहनातून तिरैया गावी गेले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर घरी परतत असताना पिकअपने रस्ताच्या कडेला उभ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाची प्राणज्योत रुग्णालयात उपचारांदरम्यान मालवली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचीही ओळख पटली आहे. निषाद (वय – 50), निरा साहू (वय – 55), गीता साहू (वय – 60), अग्निया साहू (वय – 60), खुशबू साहू (वय – 39), मधु साहू (वय – 5), रिकेश निषाद (व य – 6), ट्विंकल निषाद (वय – 6) अशी मृतांची नावे आहेत, तर एकाची ओळख पटलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;