महिलेच्या फसवणूक प्रकरणी एकाला अटक 

महिलेच्या फसवणूक प्रकरणी एकाला अटक 

ऑनलाईन कर्जाच्या नावाखाली महिलेच्या फसवणूक प्रकरणी एकाला एमएचबी पोलिसांनी अटक केली. गिरीश फडतरे असे त्याचे नाव आहे. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

तक्रारदार महिला या बोरिवली येथे राहतात. फेब्रुवारी महिन्यात त्या घरी होत्या. तेव्हा त्यांना एकाने पह्न केला. त्याने तो खासगी बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवले. त्यानंतर त्याने महिलेला कर्जाविषयी माहिती सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. कर्जाची गरज असल्याने महिलेने त्यास होकार दिला. होकार दिल्यावर महिलेकडून कर्जाच्या नावाखाली त्याने पैसे घेतले. पैसे घेऊन महिलेला कर्ज दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

परिमंडळ-11चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, रवी पाटील, जोपळे, इलग, राणे यांच्या पथकाने तपास सुरू केला. फसवणुकीची रक्कम ज्या खात्यात जमा झाली होती, त्या खात्याची माहिती काढली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फडतरेला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी फडतरेला अटक केली. त्याच्याकडून मोबाईल, सिम कार्ड आणि डेबिट कार्ड जप्त केले आहे. फडतरेला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;