अल्पवयीन मुलावर अत्याचार; नराधमाला 20 वर्षे शिक्षा
आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणाऱया 43 वर्षीय नराधमाला विशेष पोक्सो न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. धारावी येथील मंदिराशेजारील परिसरात कोरोना लॉकडाऊन काळात 22 जुलै 2020 रोजी ही घटना घडली होती. या घटनेच्या धक्क्यामुळे पीडित मुलगा यापुढे सामान्य जीवन जगू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायाधीश प्रिया बनकर यांनी आरोपी मोहन मुरगन याला दोषी ठरवले.
नराधम मोहनचा गुह्यातील सहभाग सिद्ध करण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रांजली जोशी यांनी भक्कम साक्षी-पुरावे सादर केले. खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, पीडित आठ वर्षांचा मुलगा घराजवळ खेळत होता. आरोपीने त्याला खेळण्यासाठी मंदिरात बोलावले. पीडित मुलगा मंदिराच्या आवारात येताच आरोपीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर घटनेची कुठेही वाच्यता न करण्यासाठी धमकी दिली होती. मात्र मुलगा घाबरलेला असल्याचे लक्षात येताच पालकांनी त्याला विश्वासात घेतले आणि संपूर्ण प्रकार उघड झाला. त्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आणि आरोपी मोहनला पोक्सो कायद्याखाली अटक केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List