Video संपत्तीच्या वादातून मुलाची जन्मदात्याला बेदम मारहाण, हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचा मृत्यू

Video संपत्तीच्या वादातून मुलाची जन्मदात्याला बेदम मारहाण, हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचा मृत्यू

पैशांचा हव्यास माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाऊ शकतो. असाच भयानक प्रकार तमिळनाडूमध्ये घडला असून मुलाने जन्मदात्या बापाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सदर घटना तमिळनाडूच्या पेरांबुर जिल्ह्यामध्ये घडली आहे. आरोपीचे नाव संतोष असे सांगण्यात येत आहे. संपत्तीवरून आरोपीचा वडील कुलंथाइवेलू यांच्याशी वाद झाला होता. त्याच रागातून त्याने कुलंथाइवेलू यांच्यावर हल्ला केला आणि काही समजण्याच्या आत त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. मारहाणीनंतर काही व्यक्तींनी कुलंथाइवेलू यांना जवळील रुग्णायलात दाखल केले. मात्र मिळालेल्या माहितीनुसार 18 एप्रिल रोजी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी संतोषला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी संतोषवर भारतीय दंड संहितेच्या कलम 323 आणि 324 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;