IPL 2024 : विराट आणि जॅक्सची तुफान फलंदाजी, बंगळुरूचा गुजरातवर 9 विकेटने दणदणीत विजय

IPL 2024 : विराट आणि जॅक्सची तुफान फलंदाजी, बंगळुरूचा गुजरातवर 9 विकेटने दणदणीत विजय

विराट कोहली आणि विल जॅक्स यांच्या तुफान फलंदाजीमुळे बंगळुरूची गाडी पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर आली आहे. गुजरात टायटन्सने बंगळुरूला 200 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बंगळुरूने 16 व्या षटकात पुर्ण करत गुजरातचा पराभव केला.

गुजरातने दिलेल्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली RCB ची सलामीची जोडी विराट कोहली आणि कर्णधार ड्यु प्लेसिस यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र ड्यु प्लेसिसला (12 चेंडू 24 धावा) साई किशोरने बाद केले. 40 या धावसंख्येवर बंगळुरूला पहिला हादरा बसला. त्यानंतर विल जॅक्स आणि विराट कोहलीने सर्व सुत्र आपल्या हाती घेतली. विराट कोहलीने 44 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 70 धावांची नाबाद खेळी केली. त्याला विल जॅक्सची साथ मिळाली विलने 41 चेंडूमध्ये 10 खणखणीत षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 100 धावा ठोकल्या. RCB ने तुफान फलंदाजी केली त्यामुळे 9 विकेटने गुजरातचा पराभव झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;