सोलापूर तापले, रविवारी पारा 43 अंशाच्या पार

सोलापूर तापले, रविवारी पारा 43 अंशाच्या पार

सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात असह्य वाढ होऊन ते रविवारी या वर्षातील सर्वाधिक तापमान 43.7 अंशांच्या घरात गेले आहे. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल रोजी या हंगामातील 43.1 अंश इतके सर्वाधिक तापमान होते. या वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत. सकाळी नऊपासूनच उकाडा जाणवत असून यात आबालवृद्धांना अधिक त्रास होत आहे.

बुधवारी 24 एप्रिल रोजी 41.2, गुरुवारी 41.1 शुक्रवारी 41.2 तर काल शनिवारी, 27 एप्रिल रोजी 42 अंशांच्या घरात गेले होते. रविवारी शहराचे तापमान यंदाच्या हंगामातील सर्वाधिक म्हणजे 43.7 अंश सेल्सियस इतके वाढले आहे.

असह्य़ तापमानामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच अंगाला चटके बसू लागल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरून फिरणे टाळले आहे. तर दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावरची वाहतूक रोडावली आहे. गरिक उन्हात कामे करणे टाळत आहेत. डोक्यावर उन्हाळी टोप्या, खांद्यावर पांढरे गमजे घालणे पसंत केले जात आहे, तर महिलावर्ग तोंडावर स्कार्फ घालून फिरताना दिसत आहेत. परंतु ज्यांचे हातावर पोट आहे, अशा कष्टकरी व हमालांना भर उन्हात कामे करावी लागत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;