अमित शहा, योगी कोकणात आले तर जनता त्यांना पाणी पाजणार; भास्कर जाधवांचा इशारा

अमित शहा, योगी कोकणात आले तर जनता त्यांना पाणी पाजणार; भास्कर जाधवांचा इशारा

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विनायक राऊत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यात लढत होत आहे. भाजपने राणेंना उमेदवारी दिल्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत. भाजपच्या या नेत्यांच्या दौऱ्यांवरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी भाजपला इशारा दिला आहे. अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येण्याच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास येथील जनता त्यांना कोकणाचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जाधव यांनी भाजपला दिला आहे.

खाशाबा जाधव एवढेसे होते. त्यांच्यासमोर भलेमोठे परदेशी पैलवान होते. तरीही खाशाबा यांनी त्यांना पराभूत करत सुवर्णपदक पटकावले होते. विनायक राऊतही राजकारणात तसेच आहेत. अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना सांगतो की तुम्ही कोकणात यायच्या भानगडीत पडू नका. इथे आलात तरी विनायक राऊत आणि कोकणातील जनता तुम्हाला कोकणच्या मातीचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जाधव यांनी भाजपच्या या नेत्यांना दिला. विनायक राऊत आता सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना मिळणाऱ्या जनतेच्या पाठिंब्यामुळे ते विजयाची हॅटट्रिक करतील, असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;