PK सिनेमातील न्यूड सीन कसे झाले शूट, नक्की काय होता प्लॅन? आमिर खान म्हणाला…

PK सिनेमातील न्यूड सीन कसे झाले शूट, नक्की काय होता प्लॅन? आमिर खान म्हणाला…

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये अभिनेता आमिर खान याने हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्याने अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. यावेळी आमिर खान याने ‘पीके’ सिनेमासाठी शूट करण्यात आलेल्या न्यूड सीनबद्दल मोठा खुलासा केला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी सीन कसे शूट करायचे आहेत… याबद्दल सांगितलं होतं. एका ग्रहावरुन एलियन येतो आणि न्यूड असतो. त्यानंतर एक व्यक्ती एलियनकडून त्याचं रिमोट हिसकावलं जातं. रिमोट घेण्यासाठी तो एलियन व्यक्तीचा पाठलाग करु लागतो…. अशात आमिरने दिग्दर्शकांना विचारलं पूर्ण सून न्यूड करायचा आहे?

तेव्हा राजकुमार हिरानी अभिनेत्याला म्हणालू, पूर्ण सीन योग्य काळजी घेऊन शूट केला जाईल. सीन शूट होत असताना कमी लोकं सेटवर उपस्थित राहतील. सीन शूट होण्यासाठी अभिनेता फक्त क्रिकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या गार्डचा वापर करणार होता. राजस्थान याठिकाणी सीनचं शूटिंग होणार होतं.

पुढे अभिनेता म्हणाला, ‘सीन शूट होत असताना काहीही नाही वाटायचं. पण मी जेव्हा ट्रेनच्या मागे धावायचो तेव्हा अडचणी यायच्या… अनेक रीटेक घेतले तरी सीन पूर्ण होत नव्हता. अशात मी गार्डशिवाय पूर्ण न्यड होऊन सीन शूट करण्याचा निर्णय घेतला…’ अशा प्रकारे पूर्ण न्यून होऊन आमिर खान याने ‘पीके’ सिनेमातील ट्रेनच्या मागे धावण्याचा सीन शूट केला.

‘पीके’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 2014मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ‘पीके’ या सिनेमाने जगभरात 854 कोटी रुपयांची कमाई केली होती. आज देखील सिनेमा चाहते तितक्याच आवडीने पाहातात. सिनेमात आमिर खान याच्यासोबत अभिनेता संजय दत्त, राजकुमार सिंह राजपूत, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

सिनेमातील गाण्यांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. तर पीके सिनेमामुळे चाहत्यांमध्ये असलेली आमिर खान याची क्रेझ आणखी वाढली. सोशल मीडियावर देखील सिनेमाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याची चर्चा रंगली आहे.

आमिर खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आमिर खान फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. नुकताच अभिनेत्याची दुसरी पत्नी किरण राव हिचा ‘लापता लेडिज’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. तेव्हा देखील अभिनेता सिनेमाचं प्रमोशन करताना दिसला.
आमिर खान आणि किरण राव विभक्त झाले असले तरी, मात्र कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. किरण राव हिने देखील तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;