मोबाईल हिसकावणारी दुकली गजाआड

मोबाईल हिसकावणारी दुकली गजाआड

 

रात्रपाळीची डय़ुटी आटोपून घराकडे निघालेल्या एका तरुणाच्या हातातला मोबाईल हिसकावून दोघेजण दुचाकीवरून पळाले होते. पण याप्रकरणी तरुणाने तक्रार देताच गोवंडी पोलिसांनी शिताफीने तपास करत दोघा आरोपींना पकडून त्यांनी चोरलेला मोबाईल हस्तगत केला.

गोवंडी येथे राहणारा वैभव सोनवणे (21) या तरुणाचा मोबाईल चोरण्यात आला होता. वैभव रात्रपाळीची डय़ुडी आटोपून पायीच घराकडे जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या चोरांनी वैभवच्या हातातला मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्रकटीकरण पथकाने आपल्या खबऱयांना कामाला लावून माहिती काढण्यास सुरुवात केली. तेव्हा मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवाजीनगर परिसरातून अनस शेख (20) आणि मुझम्मील खान (20) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता मुझम्मीलच्या खिशात चोरीचा मोबाईल सापडला. सत्यम टॉवरच्या गेटसमोर एका पादचाऱयाच्या हातातला मोबाईल हिसकावल्याची कबुली त्याने दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;