विश्व तिरंदाजी स्पर्धेत भारताला तीन सुवर्णपदके

पुरुष-महिलांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारात भारताचे वर्चस्व

वृत्तसंस्था/ शांघाय

येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजी फेडरेशनच्या विश्वचषक स्टेज वन तिरंदाजी स्पर्धेत पुरूष आणि महिलांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारात भारताने आपले निर्विवाद वर्चस्व राखताना 3 सुवर्णपदकांची कमाई केली. भारताची महिला तिरंदाजपटू आणि आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन ज्योती सुरेखा व्हेनामने सुवर्णपदकाची हॅट्ट्रीक साधली. ज्योती व्हेनामने महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक मिळविताना मेक्सिकोच्या अँड्रीया बिकेराचा पराभव केला. या यशामुळे 27 वर्षीय ज्योतीने महिलांच्या वैयक्तिक, सांघिक आणि मिश्र सांघिक प्रकारात 3 सुवर्णपदके मिळवून हॅट्ट्रीक मारली.

शनिवारी या स्पर्धेतील पुरूषांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातील अंतिम फेरीत भारताने नेदरलँड्सचा 238-231 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात अभिषेक वर्मा, प्रियांश आणि प्रथमेश फुगे यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. या अंतिम लढतीत भारतीय तिरंदाजपटूंनी नेदरलँड्सचा केवळ 2 गुणांच्या फरकाने पराभव केला. माईक स्कोलेसर, सिल पेटर आणि स्टेफ विल्यम्सचा यांचा नेदरलँड संघात समावेश होता. मात्र ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजी या क्रीडा प्रकारात कंपाऊंड तिरंदाजीचा समावेश नाही.

महिलांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात इटलीचा 236-225 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाजी संघामध्ये ज्योती सुरेखा व्हेनाम, आदिती स्वामी आणि परनीत कौर यांचा समावेश होता. या अंतिम लढतीत पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये भारताच्या ज्योती, आदिती आणि परनीत यांनी दोन वेळेला 10 पैकी 10 गुण मिळविले. पहिल्या तीन फेऱ्यांअखेर भारताने इटलीवर 178-171 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर चौथ्या फेरीअखेर भारताने केवळ 2 गुण गमवित हा सुवर्णपदकासाठीचा अंतिम सामना 11 गुणांच्या फरकाने जिंकला.

आता तिरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात भारतीय पुरूष संघाचा सुवर्णपदकासाठीचा सामना ऑलिम्पिक विजेत्या दक्षिण कोरिया बरोबर रविवारी होत आहे. तसेच महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात भारताच्या दीपिका कुमारीचा उपांत्य सामना दक्षिण कोरियाच्या स्पर्धका बरोबर होणार आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;