पाकचा संघ पुढील वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ लाहोर
2025 साली पाकचा क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौरा करणार असल्याची अधिकृत माहिती पीसीबीच्या प्रवक्त्याने दिली आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघात पाच सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. पाक आणि न्यूझीलंड क्रिकेट मंडळाकडून या दौऱ्याबाबत अधिकृत हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे.
2023 नंतर उभय संघातील ही सहावी मालिका आहे. पीसीबीचे चेअरमन मोहसिन नक्वी आणि क्रिकेट न्यूझीलंडचे कार्यकारी संचालक स्कॉट विनिक यांची लाहोरमध्ये बैठक झाली आणि या बैठकीत या आगामी दौऱ्याला अधिकृत मंजुरी देण्यात आली. 2022-23 च्या कालावधीत न्यूझीलंड संघाने दोन वेळला पाकचा दौरा केला होता. या दौऱ्यात कसोटी आणि वनडे मालिका खेळविली होती. त्यानंतर गेल्या जानेवारीत पाकने न्यूझीलंडच्या दौऱ्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List