भारताचा कॅनडावर विजय

वृत्तसंस्था/ चेंगडु (चीन)

शनिवारपासून येथे सुरु झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या महिलांच्या उबेर चषक सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताने कॅनडाचा 4-1 अशा फरकाने पराभव करत आपल्या मोहिमेला शानदार प्रारंभ केला.

भारत आणि कॅनडा यांच्यातील या लढतीमध्ये भारताची नवोदीत बॅडमिंटनपटू अस्मिता चलिहाने शानदार कामगिरीचे दर्शन घडविताना कॅनडाच्या अव्वल मिचेली ली चा एकेरीच्या सामन्यात 26-24, 24-22 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. अस्मिताने हा सामना 42 मिनिटांमध्ये जिंकला. कॅनडाच्या ली ने 2014 आणि 2022 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात भारताच्या के. प्रिया आणि श्रुती मिश्रा यांनी कॅनडाच्या कॅथरेनी चोई व जेसलीन चो यांचा 21-12, 21-10 असा पराभव करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एकेरीच्या सामन्यात भारताच्या इशरानी बारुआने कॅनडाच्या झेंगवर 21-13, 21-12 अशी मात केली. या विजयामुळे भारताने कॅनडावर 3-0 अशी विजयी आघाडी मिळविली होती. त्यानंतर महिलांच्या दुसऱ्या दुहेरीच्या सामन्यात कॅनडाच्या जॅकी डेंट व क्रिस्टल यांनी भारताच्या सिमरन सिंघी व रितीका ठक्कर यांचा 21-15, 21-11 असा पराभव केला. आता भारतीय महिला संघाचे अ गटातील पुढील सामने अनुक्रमे रविवारी आणि मंगळवारी सिंगापूर व चीन बरोबर होणार आहेत. तसेच थॉमस चषक पुरूषांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची सलामीची लढत थायलंड बरोबर होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;