रचना बागवे यांची विश्वविक्रमाला गवसणी

रचना बागवे यांची विश्वविक्रमाला गवसणी

सलग 365 दिवस 365 मुलाखती घेऊन रचना लचके-बागवे यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली. या उपक्रमाची सुरुवात 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर झाली आणि 20 एप्रिल 2024 रोजी 365 दिवस पूर्ण झाले. मुलाखतीच्या शृंखलेमध्ये उद्योजक, शासकीय अधिकारी, समाजसेवक आणि कलाकार असे विविध पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा जीवन प्रवास ‘रचना लचके – बागवे’ या त्यांच्या यूटय़ूब चॅनेलवर उलगडण्यात आला. 365 व्या दिवशी म्हणजेच 20 एप्रिल रोजी एक भव्यदिव्य कार्यक्रम श्री शिवाजी मंदिर नाटय़गृहात पार पडला. या कार्यक्रमात ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे डॉ. दिनेश गुप्ता यांनी त्यांना सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन रेकॉर्ड होल्डर म्हणून जाहीर केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;