अजूनही यौवनात ‘मी’! 60 व्या वर्षी अलेजांड्रा रॉड्रिग्जने जिंकली सौंदर्य स्पर्धा

अजूनही यौवनात ‘मी’! 60 व्या वर्षी अलेजांड्रा रॉड्रिग्जने जिंकली सौंदर्य स्पर्धा

अलेजांड्रा मारीसा रॉड्रिग्ज यांनी वयाच्या 60 व्या वर्षी मिस युनिव्हर्स ब्यूनोस आयर्सचा किताब जिंकला. अलेजांड्रा या पेशाने वकील आणि पत्रकार आहेत. अलेजांड्रा यांचे स्पर्धेतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अर्जेंटिनाच्या ब्यूनोस आयर्समधील प्लाटा येथे अलेजांड्रा रॉड्रिग्ज राहतात. त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी हा किताब जिंकून वय आणि सौंदर्याची व्याख्या बदलून टाकली आहे. अलेजांड्रा यांनी ही स्पर्धा जिंकून एक उत्तम उदाहरण स्थापित केले आहे. एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पुढील महिन्यात नियोजित मिस युनिव्हर्स अर्जेंटिनाची निवड होणार आहे. त्यात जर त्यांची निवड झाली तर त्या मेक्सिकोत होणाऱया 28 सप्टेंबर 2024 च्या मिस युनिव्हर्स वर्ल्ड स्पर्धेतसुद्धा दिसतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;