‘तारक मेहता..’मधील रोशन सोढी बेपत्ता असल्याप्रकरणी पोलिसांची महत्त्वपूर्ण माहिती

‘तारक मेहता..’मधील रोशन सोढी बेपत्ता असल्याप्रकरणी पोलिसांची महत्त्वपूर्ण माहिती

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरूचरण सिंग सोमवारपासून बेपत्ता आहे. गुरूचरण सध्या कुठे आणि कोणासोबत आहे, याची माहिती अद्याप मिळाली नाही. तो दिल्लीत राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांना भेटायला गेला होता. तिथून तो मुंबईला परतलाच नाही. 22 एप्रिलपासून गुरूचरणबद्दल कोणतीच माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळाली नाही. याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे. दक्षिण पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त रोहित मीना म्हणाले, “गुरूचरणच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवली आहे की तो 22 एप्रिलपासून बेपत्ता आहे. तो दिल्लीहून मुंबईला जाणार होता. पण तो तिथे पोहोचलाच नाही. आम्ही आयपीसीच्या कलम 365 अंतर्गत केस दाखल केली आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी आम्ही एक टीम नेमली आहे आणि आमची टेक्निकल टीमसुद्धा याप्रकरणी काम करत आहे. आम्ही सीसीटीव्हीची तपासणी करत आहोत, ज्यामध्ये तो एकटाच चालताना दिसून येत आहे.”

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहायला मिळतंय की गुरूचरण हा रात्री 9.14 वाजता दिल्लीत एकटाच चालतोय. पालम परिसरातील परशुराम चौकमध्ये तो चालताना दिसून आला. यावेळी त्याच्या पाठीवर एक बॅगसुद्धा आहे. याप्रकरणी पोलीस त्याच्या बँकेचीही माहिती घेत आहे. गुरूचरण बेपत्ता असल्याप्रकरणी सीसीटीव्हीशिवाय अद्याप पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले नाहीत. त्याचा फोनसुद्धा बंद आहे. गुरूचरणवर कोणता मानसिक दबाव नसल्याचंही पोलिसांनी म्हटलंय.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना गुरूचरणच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की तो त्याच्या आईवडिलांना भेटण्यासाठी अनेकदा दिल्लीला येत असतो. जेव्हा कधी तो दिल्लीत येतो, तेव्हा लहान मुलांशी हसतखेळत बोलतो, त्यांच्यासोबत फोटो काढतो, असंही त्यांनी सांगितलं. गुरूचरण हा गेल्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता..’ मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारत होता. काही महिन्यांपूर्वीच त्याने या मालिकेचा निरोप घेतला. रोशन सिंगची भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;