हार्दिक काका झाला, कृणालच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; ठेवलं युनिक नाव

हार्दिक काका झाला, कृणालच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; ठेवलं युनिक नाव

लखनऊ सुपर जायंट्सचा अष्टपैलू खेळाडू आणि हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पांड्याने सर्वांनाच आनंदाची बातमी दिली आहे. कृणाल पांड्या दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी पत्नी पंखुरी शर्मा यांनी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. कृणाल आणि पंखुरी यांनी त्याचे नाव वायू असं ठेवले आहे. कृणालने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही आनंदाची माहिती दिली. कृणाल आणि पंखुरीला 21 एप्रिलला पुत्र रत्नाचा लाभ झाला. मात्र आज त्यांनी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

कृणाल आणि पंखुरी यांचे 2017 मध्ये लग्न झाल होत. जुलै 2022 मध्ये पंखुरीने त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. त्याचे नाव कवीर असे आहे. आता दोन वर्षांनंतर पंखुरीने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव वायू ठेवले आहे. कृणाल सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्थ होता. मात्र गुड न्यूज मिळाल्यानंतर तो लगेचच आयपीएलमध्ये ब्रेक घेऊन पत्नी व मुलाला भेटण्यासाठी आला. यावेळी त्याने पत्नी व त्याच्या दोन्ही मुलांसोबत फोटो काढले. हे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कृणालने सोशल मीडियावर शेअर केलेल्य़ा फोटोवर चाहत्यांनी तसेत अनेक खेळाडूंनीही शुभेच्छा दिल्या आहेत. दिनेश कार्तिक आणि शिखर धवनसह अनेक क्रिकेटपटूंनीही कृणाालचे अभिनंदन केले आहे. त्याने शेअर केलेल्या या पोस्टला आत्तापर्यंत 90 हजारांहून जास्त लोकांनी लाईक केले आहे. तसेच लखनौ सुपर जायंट्सच्या संपूर्ण टीमने देखील क्रुणालचे अभिनंदन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;