T-20 World Cup 2024 : राजस्थान रॉयल्सचे 10 खेळाडू विश्वचषकात खेळताना दिसणार?

T-20 World Cup 2024 : राजस्थान रॉयल्सचे 10 खेळाडू विश्वचषकात खेळताना दिसणार?

IPL 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या धमाकेदार कामगिरीमुळे राजस्थानच्या संघाने सर्वच सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. खेळाडूंनी केलेल्या चांगल्या प्रदर्शनामुळेचं सर्वाधिक सामने जिंकून राजस्थानचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. याच संघातील 10 खेळाडू जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत क्रिकेटपटूही होणार मालामाल; ‘बीसीसीआय’ लवकरच घेणार मोठा निर्णय

राजस्थानकडून सलामीला उतरणाऱ्या जॉस बटलर टी-20 विश्वचषकात इंग्लंड संघाचे आणि रोवमन पॉवेल वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व करतना दिसणार आहेत. तर यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल आणि आवेश खान टीम इंडिया कडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शिमरन हेमायर (वेस्ट इंडिज), ट्रेंट बोल्ट (न्युझीलंड), केशव महाराज आणि नांद्रे बर्गर (दक्षिण आफ्रिका) हे खेळाडू आपापल्यला संघाकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. कोणाकोणाला संधी मिळणार याचे चित्र पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;