प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी मालिका; विशाल निकमच्या भूमिकेचं वेगळेपण

प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी मालिका; विशाल निकमच्या भूमिकेचं वेगळेपण

स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या 27 मे पासून सुरू होणाऱ्या ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेतून विशाल निकम हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ‘दख्खनचा राजा जोतिबा’ आणि ‘साता जल्माच्या गाठी’ या स्टार प्रवाहच्या मालिकेतून विशालचा निराळा अंदाज प्रेक्षकांनी पाहिला आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या निमित्ताने विशाल निकमने आपल्या भूमिकेचं वेगळेपण सांगितलं. माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकतं ते प्रेम. प्रेमात समोरच्याला बदलण्याचा अट्टहास नसतो, जे जसं आहे ते अगदी तसं त्याच्या पूर्ण गुण-दोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम. ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिकाही प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी असेल. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे.

राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्रं आहेत. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका. या मालिकेतील भूमिकेविषयी विशाल म्हणाला, “मी या मालिकेत राया हे पात्र साकारत आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि हटके असं हे पात्र आहे. फणसासारखा वरवर काटेरी आणि कठोर वाटणारा राया आतून मात्र इमोशनल आहे. अनाथ मुलं आणि आजारी लोकांबद्दल त्याला विशेष आस्था आहे. काही वर्षांपूर्वी त्याने आपल्या आईला गमावलं. त्यामुळे स्त्रियांना तो मान देतो. कुठेतरी त्याच्याही नकळत तो आईचं प्रेम शोधतो आहे. रायाला खोटं बोलणं सहन होत नाही. कितीही वाईट असलं, कटू असलं तरी खरंच बोलायचं असं त्याचं मत आहे. रायाची विठ्ठलावर प्रचंड श्रद्धा आहे. खऱ्या आयुष्यातही माझं आणि विठुरायाचं खास नातं आहे. माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो. माझ्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या मालिकेची गोष्ट देखिल पंढरपुरात घडते. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या मालिकेत विशाल निकमसोबत अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत काम करण्याविषयी विशाल पुढे म्हणाला, “पूजा बिरारीसोबत मी पहिल्यांदा काम करतो आहे. पूजा खूप समजूतदार आहे. ती स्वत:पेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करते. माणूस म्हणून ही सर्वात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. पुजाच्या याच स्वभावामुळे आमचे सीन्स खूप छान होत आहेत. मालिकेत मंजिरी आणि रायाचे विचार फार वेगळे आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात माझी आणि पुजाची छान मैत्री आहे.” येड लागलं प्रेमाचं ही नवी मालिका येत्या 27 मे पासून रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;