अजित पवारांना क्लीन चिट तर, शरद पवार समर्थकाच्या कारखान्यावर शिखर बँकेची जप्तीची कारवाई

अजित पवारांना क्लीन चिट तर, शरद पवार समर्थकाच्या कारखान्यावर शिखर बँकेची जप्तीची कारवाई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 70 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणात दोन दिवसांपूर्वीच क्लीन चिट देण्यात आली. यावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर धारेवर धरले आहे. तर दुसरीकडे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थकाचा कारखाना शिखर बँकेकडून सील करण्यात आला आहे. यावरून विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे.

शरद पवार यांचे समर्थक अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील साखरेचा साठा शिखर बँकेने जप्त केला आहे. ही कारवाई केल्यानंतर शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील केला आहे. शिखर बँकेचे 450  ते 500 कोटींचे कर्ज साखर कारखान्यावर आहे. हे कर्ज आधीच्या संचालकांनी काढले होते. हे कर्ज फेडले नसल्याने बँकेने कारवाई सुरू केली होती. या कारवाईवर अभिजीत पाटील यांनी स्थगिती मिळवली होती. पण ही स्थगिती संपताच आज बँकेच्या अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केली. विशेष म्हणजे ही कारवाई सुरू असताना अभिजीत पाटील हे करमाळ्यात शरद पवार यांच्या सभेत होते.

माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी करमाळा तालुक्यात शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला अभिजीत पाटीलही उपस्थित होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई सुरू झाल्याचे रोहित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले. यानंतर अभिजीत पाटील हे तातडीने पंढरपूरला रवाना झाले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संध्याकाळी शरद पवार यांची सभा होणार आहे.

राजकीय सूडातून कारवाई!

भाजपला रामराम करत मोहिते पाटील हे पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले. आता माढात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी अभिजीत पाटील हे मैदानात उतरले आहेत. यामुळे राजकीय सूड भावनेतून अभिजीत पाटील यांच्यावर कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;