याच्यापेक्षा कुत्र्याला लाँच केलं असतं..; सलमानचा भावोजी अत्यंत वाईटप्रकारे ट्रोल

याच्यापेक्षा कुत्र्याला लाँच केलं असतं..; सलमानचा भावोजी अत्यंत वाईटप्रकारे ट्रोल

अभिनेता आषुष शर्मा याला कायम ट्रोल केलं जातं. सिनेमांमध्ये काम करायचं होतं म्हणून सलमान खान याच्या बहिणीसोबत लग्न केलं, तर कधी कधी फक्त पैशांसाठी खान कुटुंबासोबत संबंध जोडले… असं म्हणत आयुष शर्मा याला ट्रोल केलं जातं. सांगायचं झालं तर, आयुष याने ‘लव्हयात्री’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमाची निर्मिती देखील सलमान खान याने केली. तेव्हा आयुष याला अत्यंत वाईट प्रकारे ट्रोल करण्यात आलं. ‘सलमान खान याने आयुषपेक्षा एका कुत्र्याला लाँच करायला हवं होतं…’ यावर वक्त होत आयुष याच्या डोळ्यात पाणी आलं.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आयुष याने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘माझ्या मुलांना माझ्यावर गर्व वाटावा म्हणून मी काम करत आहे. अशा प्रकारच्या कमेंटमुळे माझा अनेकदा आत्मविश्वास खचला. तेव्हा ठरवलं की असं काही करुन दाखवेल ज्यामुळे माझ्या मुलांना माझ्यावर गर्व वाटेल…’

‘गेल्या काही दिवसांपासून मी अनेक गोष्टींचा सामना करत आहे. पण जेव्हा माझी तुलना एका कुत्र्यासोबत करण्यात आली तेव्हा मला अनेक विचार सतावत होते. माझा मुलगा मोठा झाल्यानंतर इंटरनेटवर माझ्याबद्दल असं काही वाचेल ‘त्याचे वडील कुत्रा होते… अशा परिस्थितीत मला वाटलं जेव्हा माझा मुलगा, मुलगी मोठी होईल, तेव्हा ते माझ्याबद्दल फक्त चांगल्या गोष्टी वाचतील… एका मोठ्या पोर्टलने देखील मी कुत्रा आहे असं लिहिलं होतं…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

आयुष शर्मा याने ‘लव्हयात्री’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमातील गाणी तुफान गाजली. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर अधिक कमाई करु शकला नाही. ज्यामुळे आयुष शर्मा याला ट्रोल करण्यात आलं. आता आयुष लवकरच ‘रुसलान’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा 26 एप्रिला रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.

आयुष शर्मा – अर्पिता शर्मा

2014 मध्ये अर्पिता आणि आयुष यांचं मोठ्या थाटात लग्न झालं. दोघांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आज दोघे आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.

अर्पिता, सलमान खान याची बहीण असल्यामुळे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अर्पिता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अर्पिता कायम दोन मुलं आणि पतीसोबत फोटो पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;