गर्लफ्रेंडचा बर्गर खाल्ल्याने हत्या
मित्राच्या गर्लफ्रेंडचा बर्गर खाल्ल्याने एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक आणि विचित्र घटना पाकिस्तानात समोर आली आहे. आरोपीचे नाव दानियाल असून त्याने आपली गर्लफ्रेंड शाजियाला आपल्या घरी बोलावले होते. यावेळी त्याचा मित्र किरियो आणि भाऊ अहमदसुद्धा उपस्थित होता. आरोपीने त्याच्यासाठी आणि गर्लफ्रेंड शाजियासाठी दोन बर्गर ऑर्डर केले होते. परंतु, किरियोने शाजियाच्या बर्गरमधील एक छोटासा तुकडा खाल्ला. याचा राग अनावर झाल्याने दानियालने मित्राची गोळय़ा घालून हत्या केली. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. आरोपी पोलीस अधीक्षकांचा मुलगा असून पीडित तरुण एका सत्र न्यायाधीशाचा मुलगा आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List