वर्षांपूर्वीचा वाद अखेर मिटला? कृष्णा अभिषेकच्या पत्नीने गोविंदाच्या पायांना स्पर्श करत घेतला आशीर्वाद

वर्षांपूर्वीचा वाद अखेर मिटला? कृष्णा अभिषेकच्या पत्नीने गोविंदाच्या पायांना स्पर्श करत घेतला आशीर्वाद

अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक या मामा-भाचामधील वाद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आला आहे. गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंहचा नुकताच लग्नसोहळा पार पडला. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्य उपस्थित होता. मात्र गोविंदा आणि त्यांची पत्नी कुठेच दिसले नव्हते. त्यामुळे लग्नातही ते भाचीला आशीर्वाद द्यायला येणार नाही, अशी चर्चा होती. आमचा राग त्यांनी आरतीवर काढू नये, असं वक्तव्य कश्मीराने लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांदरम्यान माध्यमांशी बोलताना केलं होतं. इतकंच नव्हे तर गोविंदा लग्नाला आले तर मी त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेईन आणि त्यांचं जोरदार स्वागत करेन, असंही तिने म्हटलं होतं. त्यानंतर गोविंदा यांनी आरतीच्या लग्नाला उपस्थित राहून सर्वांनाच खुश केलं.

आरतीने दीपक चौहानशी धूमधडाक्यात लग्न केलं. या लग्नसोहळ्याला कुटुंबीयांसह टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्याचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आरतीच्या लग्नाला गोविंदा उपस्थित राहिल्याने कश्मीरा आणि तिचा पती कृष्णा अभिषेक यांनाही फार आनंद झाला. “आम्ही सर्वजण खूप खुश आहोत”, असं त्यांनी म्हटलं. यावेळी जेव्हा कश्मीरा विचारलं गेलं की तिने गोविंदा यांच्या पाया पडल्या का, त्यावर ती म्हणाली, “अर्थात.. ही काही सांगायची गोष्ट नाही. ते नेहमीच खूप गोड वागायचे. त्यांनी माझ्या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आरतीच्या लग्नात गोविंदाच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मंडपात जाण्यापूर्वी त्यांनी चाहत्यांना आणि मीडियाला फ्लाइंग किस केलं. मात्र पापाराझींसमोर त्यांनी फोटोसाठी पोझ देण्यास नकार दिला आणि थेट ते लग्नमंडपाच्या दिशेने निघाले. “मामा आल्याने मला खूप आनंद झाला आहे. ही आमच्या मनातली गोष्ट आहे. आमचं भावनिक कनेक्शन आहे”, अशा शब्दांत कॉमेडियन कृष्णा अभिषेकने आनंद व्यक्त केला.

गेल्या काही वर्षांपासून कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यात वाद सुरू होता. गोविंदाने अनेकदा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. मात्र त्या एपिसोडमध्ये अभिनय करण्यास कृष्णाने नकार दिला होता. मामासमोर जाणं त्याने टाळलं होतं. कश्मीरा आणि गोविंदा यांची पत्नी सुनीता यांनीसुद्धा माध्यमांसमोर एकमेकांना टोमणे मारले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;