‘जेव्हा मी अंथरुणातून उठू शकत…’, एग्स फ्रीज बद्दल मृणाल ठाकुर हिचं मोठं वक्तव्य

‘जेव्हा मी अंथरुणातून उठू शकत…’, एग्स फ्रीज बद्दल मृणाल ठाकुर हिचं मोठं वक्तव्य

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री मृणाल ठाकुर हिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. काम आणि जीवन यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी, एग्स फ्रीज करण्याबद्दल अभिनेत्रीने स्वतःबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. काम, प्रिसिद्धी, आरोग्य, योग्य पार्टनर इत्यादी गोष्टींबद्दल अभिनेत्रीने खुलासा केला. सध्या मृणाल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. यावेळी अभिनेत्रीने योग्य जोडीदार मिळत नसल्यची खंत देखील बोलून दाखवली…

मृणाल ठाकुर म्हणाली, ‘मला कळतं नाती निभावणं कठीण आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य पार्टनर शोधण्याची गरज आहे. जो तुम्हाला आणि तुमच्या कामाला समजू शकतो. मी आता एग्स फ्रीज करण्याबद्दल विचार करत आहे…’ पुढे मृणाल हिने अभिनेत्री मोना सिंग हिचं उदाहरण देत म्हणाली, ‘नुकताच मोना हिने देखील एग्स फ्रीज करण्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे..’

फक्त जोडीदार आणि एग्स फ्रीज करण्याबद्दलच नाही तर, मृणाल हिने त्या दिवसांचा देखील खुलासा जेव्हा अभिनेत्री अंथरुणातून उठू शकत नव्हती पण कामासाठी मृणाल हिला जावं लागत होतं आणि सीन शुट करावे लागत होते. अशा दिवसांमध्ये मृणाल हिने थेरेपी घेतली आणि कुटुंबियांवर विश्वास ठेवला.

मृणाल म्हणाली, ‘मी माझ्या कामाचा वापर मलमपट्टी प्रमाणे करत होती. पण जेव्हा मी माझं सामान पॅक केलं आणि घरी गेली तेव्हा मी दुःखी होती. या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मी थेरेपी घेत होती. ही गोष्ट अनेकांसाठी गरजेची आहे. विशेषतः अशा सेलिब्रिटींसाठी जे वेगवेगळ्या भूमिका साकारतात…’

‘माझ्या आयुष्यात अनेक अनेक लोकं आहेत, ज्यांनी मला त्रास दिला. माझे मित्र आणि माझी बहीण एवढंच नाही तर, माझ्या मांजरीमुळे देखील माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले आहे…’ असं देखील मृणाल ठाकुर म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

मृणाल ठाकुर हिचे सिनेमे

मृणाल ठाकुर हिने छोट्या पडद्यावर देखील काम केलं आहे. त्यानंतर मृणाल हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मृणाल हिने ‘सीता राम’, ‘हाय नन्ना’, ‘द फॅमेली स्टार’ यांसारख्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री लवकरच दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘पूजा मेरी जान’ सिनेमात दिसणार आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील मृणाल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;