सलमान खान गोळीबार प्रकरण; गोळीबारानंतर तीनदा बदलले कपडे

सलमान खान गोळीबार प्रकरण; गोळीबारानंतर तीनदा बदलले कपडे

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सागर पाल आणि विक्की गुप्ताने वांद्रे, सांताक्रूझ आणि सुरत येथे कपडे बदलल्याची माहिती समोर आली आहे. त्या दोघांकडे 40 गोळ्या होत्या. त्यापैकी त्याने 5 गोळ्या झाडल्या. पोलिसांनी तपास करून एकूण 17 गोळ्या जप्त केल्या असून उर्वरित गोळ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

गोळीबार प्रकरणी सागर आणि विक्कीच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना कोर्टात हजर केले होते. पोलिसांनी तापी नदी येथून दोन पिस्तूल, चार मॅगझीन, जिवंत काडतुसे जप्त केली होती.या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 9 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तर दोन जणांचे न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवले. गोळीबार करण्यापूर्वी आणि गोळीबार केल्यावर संपर्क करण्यासाठी तीन मोबाईलचा वापर केला होता. गुह्यात वापरलेला एक मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ते दोघे इंटरनेटच्या माध्यमातून एका जणाच्या संपर्कात होते. तो व्यक्ती कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.  विकीला आणि सागरला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;