उत्तर–मध्य मुंबईत काँग्रेसकडून वर्षा गायकवाड

उत्तर–मध्य मुंबईत काँग्रेसकडून वर्षा गायकवाड

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून कॉँग्रेसने मुंबई कॉँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीची घोषणा अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीकडून करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात उत्तर-मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई हे दोन मतदारसंघ कॉँग्रेसच्या वाटय़ाला आले आहेत. यापैकी उत्तर-मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगताप यांच्या नावाची चर्चा होती. अखेर गायकवाड यांच्या उमेदवारीवर कॉँग्रेसकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;