IPL 2024 : हैदराबादच्या बुलेट ट्रेनला ब्रेक लागला; बंगळुरूचा 35 धावांनी विजय

IPL 2024 : हैदराबादच्या बुलेट ट्रेनला ब्रेक लागला; बंगळुरूचा 35 धावांनी विजय

बंगळुरुने पराभवाची मालिका संपुष्टात आणली आणि हैदराबदच्या विजयी रथाला लगाम लावत हैदराबादचा 35 धावांनी पराभव केला. 207 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या हैदराबदाची तुफान लयीत असणारी सलामीची जोडी ट्रेविस हेड (3 चेंडू 1 धावा) आणि अभिषेक शर्मा (13 चेंडू 31 धावा) स्वस्तात माघारी परतली. त्यामुळेच हैदराबादची गाडी रुळावरुन घसरली. इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शाहबाज अहमदने नाबाद 37 चेंडू 40 धावा केल्या मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. कर्णधार पॅट कमिंन्सने 15 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 31 धावांची वादळी खेली केली. मात्र ग्रीनने पॅट कमिंन्सला बाद केले. 20 षटकांच्या समाप्तीनंतर हैदराबादला 8 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 171 धावांपर्यंत मजल मारता आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;