काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची उदगीर येथे सभा
लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस नेत्या प्रियांका गांधी यांची शनिवार 27 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता उदगीर येथे सभा आयोजीत करण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सभांना देशभरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या अनुषंगाने लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ लातूर लोकसभा मतदार संघातील महत्वाचे शहर असलेल्या उदगीर येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असून संपूर्ण मतदार संघातून मोठया प्रमाणात लोक या सभेला लोक उपस्थित राहतील राहणार आहेत.
लातूर लोकसभा मतदारसंघातील युवक, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उदयोजक, युवक यासह सर्व समाज घटक तसेच सर्वसमान्य नागरीकांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नेते यांनी केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List