अकोल्यामध्ये शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची शुक्रवारी सभा

अकोल्यामध्ये शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची शुक्रवारी सभा

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक 26 रोजी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची अकोले येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिली.

मागील महिन्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी अकोले यासह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी जनसंवाद यात्रा केली होती व त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला होता. भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मागील आठवड्यामध्ये वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे हे शिर्डी या ठिकाणी आले होते. त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली होती.

शिर्डी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने विविध ठिकाणी सभांचे आयोजन आता करण्यात येत आहे. चौकसभा या आता प्रत्येक ठिकाणी घेतल्या जात आहे. आघाडीच्या नेत्यांच्या सुद्धा आता सभा या ठिकाणी होणार आहेत उद्या दिनांक 26 रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची सभा अकोले या ठिकाणी होणार आहे. सुरुवातीला पदाधिकाऱ्यांची एक बैठक होणार असून त्यानंतर सभा होणार असल्याचे जिल्हाप्रमुख शेवरे यांनी सांगितले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;