उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांची उमेदवारी घोषित

उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांची उमेदवारी घोषित

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी एक असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी आता काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप भाजपकडून कोणतीही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही.

सुरुवातीला काँग्रेसकडून माजी आमदार नसीम खान यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, आता वर्षा गायकवाड यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. सहा मतदारसंघापैकी चार जागा या शिवसेनेच्या असून दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. यात उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबईवर काँग्रेसकडून उमेदवार असतील तर उर्वरित चार मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत.

दरम्यान, उत्तर मध्य मुंबईत अद्याप भाजपकडून कुणाच्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. या मतदारसंघात 2014 आणि 2019 या काळात पूनम महाजन या उमेदवार होत्या. मात्र पक्षांतर्गत वाद, तक्रारी, ज्येष्ठ नेत्यांची नाराजी आणि सर्वेक्षण अहवाल इत्यादी कारणांमुळे महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नसल्याचं बोललं जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;