एकही धाव न देता घेतल्या 7 विकेट; इंडोनेशियाच्या महिला खेळाडूने रचला विश्वविक्रम

एकही धाव न देता घेतल्या 7 विकेट; इंडोनेशियाच्या महिला खेळाडूने रचला विश्वविक्रम

एकिकडे आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पडत आहे. मात्र दुसरीकडे इंडोनेशियाची महिला खेळाडू रोहमालियाने (Rohmalia) एकही धाव न देता सात विकेट घेण्याचा भीम पराक्रम केला आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे तीने 3 षटकं निर्धाव टाकली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही फॉरमॅटमध्ये (पुरुष किंवा महिला) असा भीम पराक्रम करणारी रोहमालिया ही जगातील पहिली गोलंदाज ठरली आहे.

इंडोनेशिया विरुद्ध मंगोलिया यांच्यामध्ये झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यामध्ये इंडोनेशियाने मंगोलियाचा अगदी सहज पराभव केला आहे. इंडोनेशियाने प्रथम फंलदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 151 धावा केल्या होत्या. लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मंगोलियाला 17 वर्षीय रोहमालियाने आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवले. रोहमालियाने 3.2 षटकात एकही धाव न देता 7 विकेट घेतल्या. तसेच तिने 3 षटकं निर्धाव टाकली. रोहमालियाच्या घातक गोलंदाजीपुढे मंगोलियाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. मंगोलियाचा संपूर्ण संघ 16.2 षटकात अवघ्या 24 धावांवर तंबूत परतला आणि इंडोनेशियाने हा सामना 127 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे मंगोलियाच्या सहा फलंदाजांना भोपळा सुद्धा फोडता आला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;