सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी तब्बल तीन वेळा बदलले कपडे, अत्यंत हैराण करणारी माहिती पुढे, 40 गोळ्यांपैकी..

सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी तब्बल तीन वेळा बदलले कपडे, अत्यंत हैराण करणारी माहिती पुढे, 40 गोळ्यांपैकी..

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर 14 एप्रिलच्या पहाटे गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. ज्यावेळी सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले. हल्लेखोर सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करून थेट गुजरातला पोहचले. आता आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोघांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले, यांच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलीये.

कोर्टाने दोन्ही आरोपींना 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी आरोपींच्या 4 दिवसांची वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली केली होती. सुनावणी दरम्यान सरकारी वकिलाने कोर्टासमोर सांगितले की, आरोपी हे बिहारचे असून त्यांना आर्थिक मदत कोण करत आहे, हे पोलिसांना शोधायचे आहे. सलमान बरोबर त्यांची वैयक्तिक दुश्मनी नाहीये.

कोणाच्या सांगण्यावर त्यांनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला यावर तपास करायचा आहे. त्याचबरोबर या प्रकरणी पोलिसांना अधिक तपास करून या मागे खरा सूत्रधार कोण आहे? हे तपासायचे आहे,असा युक्तिवाद करण्यात आला. त्याचबरोबर युक्तिवाद दरम्यान सरकारी वकिलाने सांगितले की, तपासात असे समोर आले आहे की, गोळीबारानंतर आरोपींनी तीन वेळा कपडे बदलले.

फक्त कपडेच नाही तर त्यांनी चेहरा देखील बदलण्याचा प्रयत्न केला. आपली ओळख लपवण्यासाठी आरोपी असे करत होते, हे देखील सांगण्यात आले. आरोपीकडे एकूण 40 गोळ्या होत्या. त्यापैकी 5 गोळ्या सलमान खान याच्या घराबाहेर फायर करण्यात आल्या आणि 17 जप्त करण्यात आल्या आहेत. उरलेल्या गोळ्या नेमक्या कुठे आहेत, याचाही शोध पोलिसांना करायचा आहे.

सलमान खान याच्या घरावर गोळीबार करून हे हल्लेखोर गुजरातला पळून गेले होते. भुजच्या एका मंदिरातून हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला सतत जिवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. आता सलमान खान याच्या घरावर थेट गोळीबार झाल्याने चाहते हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले. या प्रकरणात काही मोठे खुलासे देखील केले जाऊ शकतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;