IPL 2024 : शुभमन गिलने रचला इतिहास, विराट कोहलीचा रेकॉर्ड काढला मोडीत

IPL 2024 : शुभमन गिलने रचला इतिहास, विराट कोहलीचा रेकॉर्ड काढला मोडीत

हार्दिक पंड्याने गुजरातला रामराम ठोकून मुंबई इंडियन्सचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे गुजरात संघाचे नेतृत्व तरुण खेळाडू शुभमन गिलकडे सोपावण्यात आले. मात्र गुजरातला अद्याप तरी लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. मात्र कर्णधार शुभमन गिलने एक एतिहासिक कामगिरी करत विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

कुणाला पंडय़ा नकोय तर कुणाला पंत! टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानच्या दिग्गजांचे संभाव्य संघ जाहीर

शुभमन गिल आयपीएलमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात युवा हिंदुस्थानी खेळाडू बनला आहे. हा रेकॉर्ड यापूर्वी विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहलीने वयाच्या 25 व्या वर्षी आयपीएलमध्ये 100 सामने खेळण्याचा रेकॉर्ड केला होता. तर शुभमन गिलने विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडीत काढत वयाच्या 24 व्या वर्षी 100 सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. या विक्रमासहीत शुभमन आयपीएलमध्ये 100 सामने खेळणारा दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

सर्वात कमी वयामध्ये 100 आयपीएल सामने खेळण्याचा विक्रम राशीद खानच्या नावावार आहे. राशीद खानने 24 वर्षे आणि 221 दिवसांचा असताना 100 सामने खेळण्याचा रेकॉर्ड केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;