संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा

संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा

संभाजी ब्रिगेडच्या नाशिक येथे झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. त्यानंतर संभाजी ब्रिगेड नगर दक्षिणच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची भेट घेत त्यांना पाठिंबा देण्यात आला. त्यावेळी त्यांना महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक भेट देण्यात आले.

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी लढत राहणार असल्याचे सांगितले. साकळाई पाणी प्रश्न सोडविणार असून शेतकऱ्यांच्या कांदा, दूध, कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांना हमीभाव आणि शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगा लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लंके यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

नगर दक्षिण मधील संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते निलेश लंके यांचा प्रचार करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;