निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा, 21 लाखांचे बक्षीस जिंका!

निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा, 21 लाखांचे बक्षीस जिंका!

विविध स्तरांवरील निवडणूक निकालांचे भाकीत प्रत्येक निवडणुकी वेळी ज्योतिषी वर्तवीत असतात. त्याला राजकीय नेतेदेखील बळी पडतात. त्यांच्या या कृतीमुळे गैरसमज पसरतात आणि अंधश्रद्धा निर्माण होतात. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून 21 लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देशातील ज्योतिषांना आव्हान दिले आहे. या पत्रकावर डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मिलिंद देशमुख, प्रकाश घादगिने, विनोद वायंगणकर, प्रवीण देशमुख यांनी दिली. पत्रकाद्वारे त्यासाठीची आवाहन प्रक्रिया, प्रश्नावली महाराष्ट्र ‘अंनिस’ने जाहीर केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;