सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठे ट्विस्ट, मोठा खुलासा, गोळीबारानंतर हल्लेखोरांनी गुजरातलाच ‘का’ पलायन केले?, थेट..

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठे ट्विस्ट, मोठा खुलासा, गोळीबारानंतर हल्लेखोरांनी गुजरातलाच ‘का’ पलायन केले?, थेट..

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सर्वचजण हैराण झाले. हेच नाही तर 14 एप्रिलला पहाटे पहाटे हा गोळीबार सलमान खान याच्या घरावर करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर एक मोठी खळबळ बघायला मिळाली. गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तब्बल वीस टीम तयार केला आणि अवघ्या काही तासांमध्येच हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. सलमान खान याच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोई याने घेतली, अनमोल लॉरेंस बिश्नोईचा भाऊ आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर हे हल्लेखोर थेट गुजरातमध्ये गेले. यावेळी हल्लेखोर हे पोलिसांना लोकेशन कळू नये, याकरिता सतत प्रवासाची साधणे बदल होते. हल्लेखोरांनी लपून बसण्यासाठी गुजरातच का निवडले याबद्दल आता थेट मोठा खुलासा झालाय. अनमोल बिश्नोई हा सतत हल्लेखोरांच्या संपर्कात असल्याचे देखील तपासात उघड झाले आहे.

अनमोल बिश्नोई याने हल्लेखोरांना सांगितले होते की, हल्ला झाल्यानंतर बिहारमध्ये अजिबातच यायचे नाही. कारण ते तुमचे मुळ गाव असल्याने पोलिस आरामात तुम्हाला पकडू शकतात. गुजरात आणि साऊथमध्ये जाण्यास अनमोल बिश्नोई याने हल्लेखोरांना सांगितले होते. काही दिवस लपून राहण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या.

राजस्थान, पंजाब, दिल्ली आणि हरिणाया या भागात बिश्नोई गॅंगचे नेटवर्क असल्याने अनमोल बिश्नोईने हल्लेखोरांना या भागात येण्यास मनाई केली होती. यामुळेच सर्वात सुरक्षेत राज्य अनमोल बिश्नोईला गुजरात वाटले. मात्र, अनमोल बिश्नोईचा प्लॅन इथेच फसला. मुंबई पोलिसांनी हल्लेखोरांना अवघ्या काही तासांमध्येच ताब्यात घेतले.

सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी भुजच्या एका मंदिरातून अटक केली. विशेष म्हणजे या मंदिरात पोलिस हे वेशांतर करून केले होते. भाविक म्हणून पोलिस मंदिरात दाखल झाले. यावेळी हल्लेखोर मंदिरात एका कोणात झोपले होते. पोलिसांनी पकडल्यानंतर नेमके काय घडत आहे, हे हल्लेखोरांना काही वेळ समजलेच नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;