Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ऑनलाइन ग्राहक जोडण्यास बंदी

Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ऑनलाइन ग्राहक जोडण्यास बंदी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेला क्रेडिट कार्ड बनवण्यास तसेच नवीन ऑनलाइन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयने डेटा सुरक्षेच्या कारणांमुळे ही कारवाई केली आहे. मात्र घाबरण्याचे काही कारण नाही. बॅंक आपल्या ग्राहकांना सेवा देणे सुरूच ठेवणार आहे. ज्यामध्ये क्रेडिट कार्डधारकांचाही समावेश आहे.

कोटक महिंद्राबाबत घेतलेल्या या निर्णयाचे एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये आरबीआयने कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 35A अंतर्गत नवीन ग्राहक जोडण्यास आणि ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन क्रेडिट कार्ड तयार करण्याचे कामकाज बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र यादरम्यान विद्यमान ग्राहकांना सेवा देण्यावर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत.

आयटीशी संबंधित त्रृटी लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने 2022 आणि 2023 या वर्षांसाठी आयटीशी संबंधित तपास केला होता. ज्यामध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकार उघड झाले. त्यामुळे वेळेवर या समस्यांचा तोडगा काढण्यात बँक अपयशी ठरली आहे. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. आयटी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, पॅच आणि चेंज मॅनेजमेंट, युजर रिच मॅनेजमेंट, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, डेटा सिक्युरिटी, डेटा लीक प्रतिबंधक स्ट्रॅटेजी, बिझनेस कंटिन्युटी, डिझास्टर रिकव्हरी हार्डनेस आणि ड्रिल इत्यादी क्षेत्रात गैरप्रकार आढळून आले आहेत. सलग दोन वर्षे बँकेला नियामक मार्गदर्शक तत्वानुसार आवश्यकतेच्या विरुद्ध IT जोखीम आणि माहिती सुरक्षा गव्हर्नन्समध्ये त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;