कंगनासोबतच्या ब्रेकअपबद्दल अध्ययन सुमनने सोडलं मौन; म्हणाला “तेव्हा मी 20 वर्षांचा..”

कंगनासोबतच्या ब्रेकअपबद्दल अध्ययन सुमनने सोडलं मौन; म्हणाला “तेव्हा मी 20 वर्षांचा..”

अभिनेता अध्ययन सुमन हा संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर तो कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. यामध्ये त्याचे वडील शेखर सुमनसुद्धा त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. या वेब सीरिजच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अध्ययनला त्याच्या जुन्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अध्ययन हा अभिनेत्री कंगना राणौतला डेट करत होता. या दोघांचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप हा बॉलिवूड इंडस्ट्रीत चर्चेचा विषय ठरला होता. कंगनासोबतच्या ब्रेकअपबद्दल अध्ययनला या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला.

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अध्ययनला ब्रेकअपविषयी प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “मला त्या व्यक्तीविषयी चर्चा किंवा काही वक्तव्य करायचं नाही. ज्या व्यक्तीचा तुम्ही उल्लेख करत आहात, त्या भूतकाळाविषयी मी विसरलोय. पण तुम्ही विचारत असाल तर मी सांगू इच्छितो की माझ्याकडून मी सर्व गोष्टी मिटवलेल्या आहेत. मी माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून आलोय. हा तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा मी वीस वर्षांचा होतो. आता मी 36 वर्षांचा आहे. जुन्या गोष्टींना पकडून बसणं मूर्खपणाचं ठरेल.”

या मुलाखतीत अध्ययनला त्याच्या लग्नाच्या प्लॅनविषयीही प्रश्न विचारला गेला. त्यावर तो म्हणाला, “मला असं वाटतंय की आता माझं आयुष्य रुळावर यायला लागलंय. पुढील दोन वर्षांत कदाचित मी लग्न करेन.” 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राज: द मिस्ट्री कन्टिन्यूज’ या चित्रपटाच्या सेटवर कंगना आणि अध्ययन यांच्यात जवळीक निर्माण झाली. शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. ब्रेकअपनंतर अध्ययनने कंगनावर बरेच आरोप केले होते. 2016 मध्ये एका मुलाखतीत जेव्हा कंगना आणि हृतिक रोशन यांच्यात वाद सुरू होता, तेव्हा अध्ययनने पुन्हा एकदा तिच्यावर काळी जादू केल्याचा आरोप केला होता.

एका मुलाखतीत अध्ययनचे वडील शेखर सुमनसुद्धा कंगनासोबतच्या त्याच्या रिलेशनशिपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले होते. “आपण सर्वजण आयुष्यातील विविध टप्प्यांतून जातो. जे आज योग्य वाटतं, ते कदाचित उद्या योग्य वाटणार नाही. एखाद्या रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर ब्रेकअप करण्याची इच्छा कोणाचीच नसते. प्रत्येक जोडीला असं वाटतं की त्यांचं नातं अखेरपर्यंत टीकावं”, असं ते म्हणाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;