लोकसभा निवडणुकीचे अचूक भविष्य सांगा, 21 लाख मिळवा… कोणी दिले आव्हान

लोकसभा निवडणुकीचे अचूक भविष्य सांगा, 21 लाख मिळवा… कोणी दिले आव्हान

लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा ज्वर वाढला आहे. सर्वच पक्षांच्या प्रचार सभा होत आहे. रोड शोमुळे शहरे गजबजली आहेत. राजकीय पक्षांकडून कोणाला किती जागा मिळणार? याचा दावा केला जात आहे. त्याचवेळी काही व्यक्ती कोण पंतप्रधान होणार, सत्तेत कोणता पक्ष येणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? असे भविष्य वर्तवत आहेत. राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आव्हान दिले आहे. अचूक भविष्य सांगणाऱ्यांना २१ लाखांचे बक्षीस अंनिसने जाहीर केले आहे. राजकीय विश्लेषक सोडून, जे ज्योतिष्यशास्त्र म्हणून राजकीय भविष्य सांगतात त्यांना हे खुले आव्हान देण्यात आल्याचे अंनिसचे मिलिंद देशमुख यांनी म्हटले आहे.

काय आहे अंनिसचे आव्हान

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. अनेक राजकीय नेते देखील या फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे अज्ञानी आणि भोळ्या भाबडया लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. त्यांच्यात अंधश्रध्दा निर्माण होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे अशी माहिती अनिसने दिली आहे.

आव्हान स्वीकारण्यास प्रश्नावली भरावी लागणार

अंनिसने आव्हान स्वीकारण्यासाठी एक प्रक्रिया तयार केली आहे. त्यासाठी प्रश्नावली देखील तयार केली आहे. ही प्रश्नावली आव्हान स्वीकारणाऱ्यांना भरुन द्यावी लागणार आहे. त्यांचा हा अंदाज अचूक ठरल्यास त्यांना २१ लाख रुपये देण्यात येणार आहे. हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांसाठी आहे, असे अंनिसने म्हटले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून दरवेळी भविष्य वर्तवण्यास बक्षीस जाहीर केले जाते. परंतु अद्याप कोणीच हे आव्हान स्वीकारुन सिद्ध केले नाही. यामुळे यंदाही कोणी हे आव्हान स्वीकारणार का? हा प्रश्न आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल
सांगली मार्केट यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्डय़ात रस्ता, अशी रस्त्याची दयनीय स्थिती मार्केट यार्ड परिसरात...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया जुलैमध्ये?
पतसंस्थेची फसवणूक; व्यापाऱयाला सक्तमजुरीची शिक्षा, चार लाखांचा दंड
गणेशमूर्ती करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटिसा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगर महापालिकेची मोहीम
नोकरदारांना दिलेल्या कर्जाचे 28 कोटी थकले, वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेची विशेष मोहीम
एमसीए प्रेसिडेंट चषक; माटुंगा जिमखान्याला सी आणि डी डिव्हिजनचे जेतेपद
महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना असुविधांचा फटका, वेण्णालेक ते महाडनाका दरम्यानच्या फुटपाथची दुरवस्था