पिकलबॉल स्पर्धेत भारताला 10 पदके

वृत्तसंस्था/ मुंबई

नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या पिकलबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत 10 पदके मिळविणाऱ्या भारतीय संघाचे मायदेशी आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कास्यंपदकांची कमाई केली.

या स्पर्धेमध्ये भारताच्या स्टेव्हा भसीन, धिरेन पटेल आणि हेमल जैन यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदकाची कमाई केली. सदर स्पर्धा अमेरिकेतील फ्लोरिडा येथे 14 ते 20 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. भसीनने कनिष्ठांच्या एकेरीत सुवर्णपदक तर धिरेन पटेलने पुरूषांच्या एकेरीत 5.0 प्रकारात सुवर्णपदक तसेच हेमल जैनने पुरूष एकेरीच्या 3.5 कॅटेगिरीत सुवर्णपदक मिळविले. भसीनने पुरूषांच्या दुहेरी 5.0 कॅटेगिरीत रौप्यपदक तसेच त्याने कनिष्ठ पुरूषांच्या दुहेरी आणि कनिष्ठ मिश्र दुहेरीत प्रत्येकी एक कास्य अशी एकूण चार पदकांची कमाई केली. रोनव मोटानिने पुरूषांच्या दुहेरीत 5.0 कॅटेगिरीत तसेच कनिष्ठ एकेरीत दोन रौप्यपदके मिळविली. तसेच त्याने कनिष्ठ पुरूषांच्या दुहेरी कॅटेगिरीत कास्यपदक मिळविले. पुरूष एकेरीच्या 5.0 कॅटेगिरीत हिमांशू देवासकरने कास्यपदक घेतले. हर्ष मेहदा आणि अमन भाटिया यांना मात्र पुरूषांच्या प्रो दुहेरी पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;