मनिकाला मागे टाकत श्रीजा अकुला 38 व्या स्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीतील विजेती महिला टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाने आंतरारष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या महिला एकेरीच्या ताज्या मानांकन यादीत 38 वे स्थान मिळविताना मनिका बात्राला मागे टाकले आहे. यापूर्वी मनिका बात्रा ही मानांकनात 37 व्या स्थानावर होती.
आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या महिला एकेरी ताजी मानांकन यादी जाहिर करण्यात आली. या यादीमध्ये श्रीजाने 38 व्या स्थानावर झेप घेतली. तर मनिकाचे स्थान दोन अंकाने घसरले. आता ती 39 व्या स्थानावर राहिल. श्रीजाने गेल्या जानेवारीत विश्व टेबल टेनिस फिडेर क्रॉप्स क्रिस्टी स्पर्धेत जेतेपद तर गेल्या मार्चमध्ये तिने बैरुथ येथे झालेल्या फिडेर स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत श्रीजा अकुलाने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मिळविले होते. महिलांच्या मानांकन यादीत यशस्वीनी घोरपडे 99 व्या तर अर्चना कामत 100 व्या स्थानावर आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List